आंदोलनांचे राजकारण नको; समस्यांवर उपाय शोधा : डॉ.मोहन भागवत

Foto
 नागपूर : समाजातील समस्यांविरोधात आंदोलने उभी राहणे स्वाभाविक आहे; मात्र, आंदोलनांचा उद्देश समस्यांवर उपाय शोधणे हा असला पाहिजे. आंदोलन राजकारणाचे साधन बनले किंवा एखाद्या व्यक्ती, समूह अथवा विचाराविषयी शत्रुत्वाची भावना ठेवून ते चालविले गेले, तर त्यातून समाजात दुही निर्माण होऊ शकते, असा स्पष्ट संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष समारोपाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान रेशीमबाग मैदानात ते बोलत होते. आंदोलनकर्ते, शांतता-सुव्यवस्था राखणारे शासन-प्रशासन आणि राजकीय नेते या सर्वांनी आपल्या कृतीतून समाजात विसंवाद, द्व्ोष, कटुता अथवा विभाजन निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

समाजात समस्या असणे आणि व्यवस्थेत त्रुटी असणे स्वाभाविक आहे. त्यातून आंदोलने उभी राहू शकतात; मात्र, भावनांचा उद्रेक झाला तरी कृती संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच राहिली पाहिजे. बोलणे, वागणे आणि परस्परांशी व्यवहार करताना सभ्यतेची मर्यादा पाळली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले. मतांचा लाभ, स्वस्त लोकप्रियता किंवा राजकीय फायदा मिळविण्याचा मोह विवेक आणि सद्भावनेवर वरचढ ठरू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे आणि नागपुर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित थे| यासोबतच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कॉन्सुल जनरल ऑफ इस्त्राईल टू मीडवेस्ट इंडिया यानिव रेवाच हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री, गडकरी संघ गणवेशात
संघाच्य विजयादशमी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी खासदार अजय संचेती, आ.परिणय फुके यांच्यासह मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळे, फुके हे तर संघ गणवेशात उपस्थित होते.

आंदोलनांतून व्यवस्थेविरोधात अविश्वास निर्माण नको
समाजातील सर्व समस्यांचे निराकरण केवळ शासन करू शकते किंवा केवळ आंदोलनांतूनच उपाय निघू शकतात, असे नाही. समाजाचा सक्रिय सहभाग आणि परस्पर संवादातूनही प्रश्न सुटू शकतात, असे भागवत यांनी नमूद केले. आंदोलनामागे देश आणि समाज आपला आहे, त्याच्या व्यवस्थेची जबाबदारी आपलीही आहे, ही भावना असावी. मात्र, आंदोलन राजकीय हत्यार बनल्यास आणि अन्यायाची भावना सातत्याने भडकवून व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण केल्यास त्याचा फायदा देशाला दुबळे करू इच्छिणार्‍या शक्तींना होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. समाजात परस्परांविषयी संशय आणि कटुता वाढविण्याऐवजी संवादातून जुन्या गाठी सोडविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. छोट्या घटनांवरून चिथावणी देऊन संघर्ष निर्माण करणार्‍या प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

व्यसनाधिनतेविरोधात देशभरात राबविणार मोहीम
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविलेल्या उपक्रमांचा उल्लेख करताना डॉ.भागवत यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशी आणि नागरिक कर्तव्यपालन या पंचपरिवर्तनाच्या पाच सूत्रांवर भर दिला. ही केवळ वर्षभराची मोहीम नसून, दैनंदिन जीवनात रुजविण्याची आचरणपद्धती असल्याचे ते म्हणाले. नव्या पिढीतील व्यसनाधीनतेची समस्या गंभीर असून, तिच्या प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. व्यसनांविरोधात देशव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक अभियान उभारण्यासाठी स्वयंसेवक देशभरात प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करताना त्यांच्या वापराला नैतिक शिस्त आणि विवेकाची जोड आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग असत्याचा प्रसार किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरजही भागवत यांनी व्यक्त केली.

वंदे मातरमला विरोध नको 
बंगालच्या फाळणीच्या काळात राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून ङ्गवंदे मातरम्फचा उदय झाला, असे सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या गीताचा उल्लेख केला. बंगालच्या फाळणीचा विभाजनकारी डाव पराभूत करणारे ङ्गवंदे मातरम्फ आजही राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देण्यास समर्थ आहे, असे ते म्हणाले. ङ्गवंदे मातरम्फ हे आपले राष्ट्रगीत आहे. ते स्वाभिमानाने, बुलंद स्वरात आणि संपूर्ण म्हणण्याबाबत कोणताही संकोच किंवा विरोध असता कामा नये, अशी भूमिका डॉ. भागवत यांनी मांडली.